पनवेल :
नशा मुक्ती अभियान अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाकरिता पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पोलीस निरीक्षक, 6 अधिकारी व 14 पोलीस अमलदार यांनी सहभाग घेतला होता. सदर वेळी पोलीस अधिकारी यांनी अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याबाबत उपसताना मार्गदर्शन करून जनजागृती केली आहे.
यावेळी पनवेल शहर पोलीस ठाणे ते साईनगर परिसरमध्ये पनवेल बोहरी मस्जिद यांचे बँड पथकाकडून रूट मार्च, पनवेल शहर पोलीस ठाणे ते पनवेल शहर परिसरात सायकल रॅली, वडाळे तलाव परिसरात व्ही के हायस्कूल पनवेल एनसीसी विद्यार्थ्यांकडून मानवी साखळी, याकूब बेग हायस्कूल येथे अमली पदार्थ सेवन दुष्परिणाम या विषयावर व्याख्यान तसेच एक धाव नशा मुक्तीसाठी कार्यक्रम, पाडा मोहल्ला मस्जिद येथे अमली पदार्थ दुष्परिणाम या विषयावर मौलवी व पदाधिकारी यांना मार्गदर्शन व सूचना, तहसील कार्यालय येथे अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन, बार्न्स कॉलेज येथे अमली पदार्थ सेवन दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन पर चर्चासत्र तसेच ओरियन मॉल येथे अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती आदी कार्यक्रम राबवण्यात आले.