उद्या जालन्यात रंगणार भव्य दही हंडी महोत्सव; चंद्रशेखर आझाद मैदान वर उत्सवाचा शिखर...
शिवचैतन्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित जालन्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी सोहळ्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह
By Yuva Aadarsh
On
जालना | प्रतिनिधी - श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त यंदा जालन्यातील सर्वात मोठा भव्य दहीहंडी महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवचैतन्य प्रतिष्ठान, जालना यांच्या वतीने बुधवारी दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता चंद्रशेखर आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा सोहळा रंगणार आहे.

या दहीहंडी सोहळ्याला जालन्यातील हजारो नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
👉 स्थळ : चंद्रशेखर आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जालना
👉 वेळ : बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५, सायं. ४.०० वा.

About The Publisher
