करंजाडेमध्ये दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा

गणेशगिरी महाराजांच्या हस्ते होणार देवीची प्राणप्रतिष्ठा

करंजाडेमध्ये दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा

पनवेल

IMG-20250809-WA0002करंजाडे येथे प.पू. गगनगिरी महाराज व स्व. सदाशिव तुकाराम साबळे यांच्या आशिर्वादाने 8 ऑगस्ट  ते 10 ऑगस्ट  श्री दुर्गामाता मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी गगनगिरी महाराजांचे शिष्य गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते  देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचे आयोजक विनोद साबळे यांनी सांगितले.

करंजाडे येथे स्व.सदाशिव साबळे यांनी प.पू.गगनगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने दुर्गा मातेचे मंदिर सन 2000 साली उभारले.या  मंदिराला 25 वर्षे पूर्ण झाली.त्यामुळे हे मंदिर जीर्ण झाले होते.त्यामुळे साबळे परिवाराने या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरवले.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. 8 ऑगस्ट 2025 रोजी गणेश पूजन , पुण्याह वाचन इत्यादी नामस्मरणाने या कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे.9 ऑगस्ट ला सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत होम हवन होणार आहे सायंकाळी पाच ते सात देवीची दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात येणार आहे.या वेळी आरिवली येथील गावदेवी भजनी भारूड मंडळाचे दिंडी भजन होणार आहे तर रात्री 9 वाजता आदई येथीलदत्त प्रासादिक भजन मंडळाचे  संगीत भजन आयोजित करण्यात आले आहे.तर रविवार 10 ऑगस्ट रोजी कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा होणार आहे.या दिवशी सकाळी 7 ते 9 या वेळेत गगनगिरी महाराजांचे शिष्य गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पूर्णाहुती 11:00 वाजता महाआरती होणार आहे.तर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत तीर्थ प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन आहे.यावेळी चिंचवली शेकीन येथील माऊली भजन मंडळ चिंचवलीचे भजन होणार आहे.करंजाडेतील ग्रामपंचायत कार्यालयासमोर हा सोहळा पार पडणार असून या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन विनोद साबळे यांनी केले आहे.

 

Read More गेडोर टी पॉईंटला कालिंका स्टीलचा सामाजिक उपक्रम; सिग्नल बसवून वाहतूक शिस्तीला नवा आधार; पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडून सत्कार; संचालक मंडळाचा पुढाकार कौतुकास्पद

Tags:

About The Publisher

Related Posts

LatestNews

उद्या जालन्यात रंगणार भव्य दही हंडी महोत्सव; चंद्रशेखर आझाद मैदान वर उत्सवाचा शिखर...
गेडोर टी पॉईंटला कालिंका स्टीलचा सामाजिक उपक्रम; सिग्नल बसवून वाहतूक शिस्तीला नवा आधार; पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडून सत्कार; संचालक मंडळाचा पुढाकार कौतुकास्पद
चंद्रशेखर आझाद मैदानात शिवचैतन्य प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी महोत्सव 2025 भूमिपूजन सोहळा संपन्न; उत्सवातून राजकीय व सामाजिक एकतेचा संदेश
कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल कळंबोली येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा
नशा मुक्तीसाठी पनवेल शहर पोलिस सतर्क
हजारो राख्या, हजारो शुभेच्छा; बंधुत्वाचा उत्सव, रक्षाबंधन निमित्त आमदार लोणीकर यांचा भावनिक कार्यक्रम
अभिनव युवक मित्र मंडळाचे यंदाचे गणेशोत्सवाचे ३५ वे वर्ष; साकारणार जंगल थीम