गेडोर टी पॉईंटला कालिंका स्टीलचा सामाजिक उपक्रम; सिग्नल बसवून वाहतूक शिस्तीला नवा आधार; पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडून सत्कार; संचालक मंडळाचा पुढाकार कौतुकास्पद
जालना । प्रतिनिधी - जालना शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या चौकांपैकी एक असलेल्या गेडोर टी पॉईंटवर वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला होता. पादचारी, विद्यार्थी, शेतकरी तसेच व्यावसायिक नागरिक यांना रस्ता ओलांडणे कठीण झाले होते. या गंभीर समस्येची दखल घेत शहरातील अग्रगण्य औद्योगिक घराणे कालिंका स्टील पुढे सरसावले. त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून (csr) या ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली आहे.


प्रसंगी वाहतूक सिग्नल बसविण्यासाठी कालिका स्टिलचे संचालक घनश्यामसेठ गोयल, बनारसदास जिंदल यांनी मदत केल्याने पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन घनश्यामसेठ गोयल यांचा गौरव केला.
या प्रसंगी संचालक मंडळातील मान्यवरांनी सांगितले की, कालिंका स्टील ही केवळ उद्योग क्षेत्रापुरती मर्यादित नाही, तर समाजाप्रतीही आपली बांधिलकी जपते. शैक्षणिक, सामाजिक आणि वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक असेल तेथे आम्ही पुढेही असे उपक्रम राबवणार आहोत. नागरिकांच्या सहकार्याने जालना शहराच्या प्रगतीत हातभार लावणे हेच आमचे ध्येय आहे.
नव्या सिग्नलमुळे परिसरातील शाळकरी मुलांना, पादचारी नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून वाहतुकीची समस्या गंभीर झाली होती. चौकात शिस्त नसल्यामुळे अपघातांचा धोका होता. कालिंका स्टीलने पुढाकार घेतल्याने ही समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे, असे मत स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केले.
गेडोर टी पॉईंटवरील हा सिग्नल केवळ वाहतुकीचा प्रश्न सुटवणारा नाही, तर सामाजिक उत्तरदायित्वाच्या दिशेने उद्योग क्षेत्राने उचललेले कौतुकास्पद पाऊल आहे.

About The Publisher
