जालन्यातील पत्रकारांना सामाजिक बांधीलकी; एआयचा वापर आणि सत्यतेची पडताळणी आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ; जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार कार्यशाळेचे उदघाटन

कार्यशाळेत प्रा. संदीप काळे आणि श्रीमती प्रणाली तायडे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन

जालन्यातील पत्रकारांना सामाजिक बांधीलकी;  एआयचा वापर आणि सत्यतेची पडताळणी आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ; जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार कार्यशाळेचे उदघाटन

जालना । प्रतिनिधी - गेल्या दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यातील पत्रकारांना मी पाहतो आहे. येथे मोठ मोठी आंदोलने झाली, लोकसभा-विधानसभा निवडणुका झाल्या. येथील पत्रकारांनी वस्तुस्थिती मांडण्याचे काम केले. सकारात्मता पसरलेल असे वृत्त दिले. येथील पत्रकारांना सामाजिक बांधीलकी असल्याचे सांगत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जालना जिल्ह्यातील पत्रकारांची पाठ थोपाटली. त्याच बरोबर पत्रकारिततेत एआयचा वापर होत असून एआय समजून घेणे आवश्यक असल्याचेही डॉ. पांचाळ यांनी म्हटले आहे.

IMG_20250722_113247

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल सभागृहात मंगळवार (दि 22) रोजी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ हे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार तर प्रमुख मार्गदर्शक जालना येथील शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संगणक विभागाचे वरिष्ठ श्रेणी प्राध्यापक प्रा. संदिप काळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील (संगायो) विभागाच्या तहसिलदार श्रीमती प्रणाली तायडे आणि जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी  यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, एआय आणि मोबाईलच्या युगात गावातील मुले देखील बे्रकींग न्यूज करत आहेत. प्रत्येकाला आज बातमी लवकरात-लवकर हवी असते. परंतू कोणतीही बातमी प्रसिध्द करण्यापुर्वी पत्रकारांना त्याची सत्यता देखील पडताळून पाहणे आवश्यक आहे. आज मोबाईल आणि एआयच्या युगामध्ये प्रत्येकाकडे बातमी असून, प्रत्येक व्यक्ती हा बातमीचा कन्टेंट तयार करु शकतो. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापर करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पत्रकारितेवर अनेक प्रमुख मार्गांनी परिणाम करत आहे. त्यामुळे एआयचा वापर कशा प्रकारे करावा हे पत्रकारांनी समजावून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात एआयचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे पत्रकारांनी देखील नवीन येणारे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही आज काळाची गरज बनली आहे. 
तसेच आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपणा सर्वांना विविध ताण-तणावांना सामोरे जावे लागत आहे. याकरीता आज आपणास जिल्हा माहिती कार्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या माध्यमातून दोन महत्वाच्या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन मिळणार असुन, या प्रशिक्षणाचा आपणास नक्कीच आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग होणार असल्याचे ही डॉ. पांचाळ यावेळी म्हणाले.
पोलीस अधिक्षक श्री. बन्सल मार्गदर्शन करतांना म्हणाले की, एआयचा वापर चांगल्यारितीने केल्यास त्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात निश्चितच फायदा होणार आहे. सध्या पत्रकारितेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी होत असून, वेग आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जात आहे. नियमित रिपोर्टिंग स्वयंचलित करून, येणार्‍या समस्या जलद गतीने कमी करून कृत्रिम बुद्धिमत्ता सद्याच्या पत्रकारितेवर परिणाम करत आहे. परंतु एआयचा वापर करतांना पत्रकारांनी बातमीची खात्री करुन घेणे देखील आवश्यक आहे .

Read More जालना झाली ’सेल्फी सिटी’: कैलास गोरंट्याल यांच्या भव्य प्रवेशाने शहर भाजपामय; ’न भूतो न भविष्यती’ अशी स्वागत रॅली!

कार्यशाळेत प्रा. संदीप काळे आणि श्रीमती प्रणाली तायडे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन

Read More आमचं ठरलंय... सेठ जिथं, आम्ही तिथं! काँग्रेस पदाधिकार्‍यांचा निर्णय; काँग्रेसला रामराम, कैलास गोरंट्याल यांचा 31 जुलै रोजी भाजप प्रवेश निश्चित

माहिती आणि महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजीत पत्रकार कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संगणक विभागाचे वरिष्ठ श्रेणी प्राध्यापक प्रा. संदीप काळे यांनी पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारीता, सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. तर तहसिलदार (संगायो) श्रीमती प्रणाली तायडे यांनी ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर पत्रकारांना बहुमुल्य मार्गदर्शन केले.
प्रा. काळे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा पत्रकारीतेमध्ये कशा पध्दतीने वापर करावा. तसेच सायबर सुरक्षा, डिपफेक, व्हिडिओ एडिटींग करणे, व्हिडिओ-ऑडीओ मजकूर रुपांतरीत करणे, भाषांतर, सादरीकरण तयार करणे, विविध अहवाल तयार करणे, ग्राफिक्स डिझाईन, विविध भाषेचा योग्य वापर आणि सायबर सुरक्षा आदी बाबत यावेळी मार्गदर्शन केले.

Read More जालन्यात गोरंट्यालांचा भाजपकडे झुकाव! खोतकरांची चिंता वाढणार ! – भाजपकडून जालना महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय?

IMG_20250722_120902

तसेच तहसिलदार प्रणाली तायडे ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपणास विविध ताण-तणावांना सामोरे जावे लागते. बदलते कामाचे स्वरूप, बदलती कुटूंब रचना, समाजामध्ये वावरण्याचे बदलेले नियम आणि सोशल मिडिया या सर्वांचा परिणाम आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होत आहेत. या वाढत्या ताण-तणावावर आपण नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यासाठी ताण-तणावांचे योग्य व्यवस्थापन करुन आपल्या जीवनशैलीत योग्य बदल घडविल्यास आयुष्य आनंदाने जगता येते.

जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी यावेळी माहिती जनसंपर्क महासंचालनालय विभागामार्फत पत्रकारांसाठी राबविल्या जाणार्‍या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी या योजनेचे पात्रता, निकष आणि आवश्यक कागदपत्रे याविषयी माहिती दिली.

कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले. तर मिलींद तुपसमिंद्रे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तसेच उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील विष्णु जायभाये, संतोष पाखरे, श्रीमती प्रतिभा इंगळे, ज्ञानोबा पांचाळ यांनी सहकार्य केले. यावेळी कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व पत्रकार, वृत्तपत्र प्रतिनिधी, संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रा. संदीप काळे यांचे मुद्दे

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे काय?
मशीनद्वारे मानवासारखे विचार, निर्णयक्षमता व कृती. पत्रकारितेमधील AI चा उपयोग
फेक न्यूज शोधणे, लेखन सहाय्य, ट्रेंड विश्लेषण, भाषांतर.
एआयचे फायदे आणि धोके
माहितीचा वेगाने प्रसार Vs खोट्या बातम्यांचा धोका. 
सायबर गुन्हेगारीचे प्रकार
सोशल मीडिया हॅकिंग, फिशिंग, डेटा चोरी, बनावट प्रोफाईल.
पत्रकारांनी घ्यावयाची काळजी
सशक्त पासवर्ड, टू-फॅक्टर ओथेंटिकेशन, सुरक्षित ईमेल व्यवहार.
सायबर कायदे व पत्रकारांचे अधिकार
आयटी अ‍ॅक्ट, फौजदारी कलमे, डिजिटल हक्क.

प्रणाली तायडे यांचे मुद्दे

ताणतणाव म्हणजे काय?
मानसिक, शारीरिक आणि भावनिक दडपणाची अवस्था.
पत्रकारिता क्षेत्रातील ताणाचे प्रमुख कारणे
वेळेचे बंधन, संवेदनशील बातम्या, अपुरी विश्रांती, स्पर्धा. ताण ओळखण्याचे लक्षणे
झोपेचा अभाव, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, मानसिक थकवा.
ताणतणाव कमी करण्याचे उपाय
श्वसनाची साधी तंत्रे, ध्यान, नियमित व्यायाम, संवाद. व्यक्तिगत वेळ व प्रोफेशनल जीवन यामध्ये समतोल राखण्याचे महत्त्व.
प्रणाली तायडे यांनी हसतखेळत प्रश्‍नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदशन केले.