देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-शेगाव दिंडीतील भाविकांसाठी दोन दिवसीय आरोग्य शिबिर; 274 भाविकांची तपासणी;

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-शेगाव दिंडीतील भाविकांसाठी दोन दिवसीय आरोग्य शिबिर; 274 भाविकांची तपासणी;

जालना | प्रतिनिधी - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर ते शेगाव जाणाऱ्या भाविक दिंडीसाठी दोन दिवसीय आरोग्य व सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.

दि. 21 जुलै 2025 रोजी, काळुनका माता मंदिर, जालना येथे पहिल्या दिवशी शिबिर पार पडले. या दिवशी एकूण 127 भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचारही देण्यात आले. याशिवाय 209 भाविकांना चरनसेवा (मसाज) देण्यात आली.

IMG-20250723-WA0005

दि. 22 जुलै 2025 रोजी, जे. ई. एस. कॉलेज येथे दुसऱ्या दिवशी शिबिर घेण्यात आले. यामध्ये 147 भाविकांची वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात आले, तर 153 भाविकांना चरनसेवा देण्यात आली.

Read More जालना झाली ’सेल्फी सिटी’: कैलास गोरंट्याल यांच्या भव्य प्रवेशाने शहर भाजपामय; ’न भूतो न भविष्यती’ अशी स्वागत रॅली!

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पुढील संस्थांनी महत्वपूर्ण योगदान दिले —
गुरु मिश्री होमिओपॅथी कॉलेज, शेलगाव, वेदप्रकाश पाटील आयुर्वेद कॉलेज, ओजस फिजिओथेरपी कॉलेज व यशवंतराव चव्हाण नर्सिंग कॉलेज, जालना.

Read More आमचं ठरलंय... सेठ जिथं, आम्ही तिथं! काँग्रेस पदाधिकार्‍यांचा निर्णय; काँग्रेसला रामराम, कैलास गोरंट्याल यांचा 31 जुलै रोजी भाजप प्रवेश निश्चित

यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारी, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे वैद्यकीय तज्ञ डॉ. सोपान चव्हाण यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली.

Read More जालन्यात गोरंट्यालांचा भाजपकडे झुकाव! खोतकरांची चिंता वाढणार ! – भाजपकडून जालना महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय?

भाविकांच्या सेवेसाठी घेतलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून, भाविकांनीही या सेवेस भरभरून प्रतिसाद दिला.