वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बालाजी मंदिर येथे संरक्षण भिंतीसाठी लोणीकरांनी दिला २० लक्ष रुपयांचा निधी; व्यापाऱ्यांसह भाविकांनी मानले लोणीकरांचे आभार

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बालाजी मंदिर येथे संरक्षण भिंतीसाठी लोणीकरांनी दिला २० लक्ष रुपयांचा निधी; व्यापाऱ्यांसह भाविकांनी मानले लोणीकरांचे आभार

परतूर | प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांतील  काम प्रचंड उल्लेखनीय असून महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात रेल्वेचे पावणे दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरु आहेत. जुनं युपीएचं सरकार होतं तेव्हा १० वर्षात जो निधी दिला तितका निधी एकाच वर्षात मोदी सरकारनं दिला.सहा लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामं झाली आहेत.  एकट्या परतुर विधानसभा मतदारसंघात ४५ हजार घरे मिळाले आहेत जी यादी होती ती सर्व समाप्त होत आहे. नवीन यादी तयार करत सर्व्हेक्षण करण्यास सांगितलं आहे अशाने जे सुटले असतील त्यांना देखील घरं मिळेल. असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी केले प्रसंगी परतुर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात विक्रमी घरं दिल्याबद्दल आमदार लोणीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
 
परतूर येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाआरती, श्री बालाजी मंदिर परिसरात २० लक्ष रुपयांचे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन आणि भाजपा कार्यालयात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती सह स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका संदर्भात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकी प्रसंगी आमदार बबनराव लोणीकर बोलत होते. यावेळी मंचावर भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांचे प्रमुख उपस्थिती होती.
 
केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले असून शेतकऱ्यांसाठी १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक बजेटची तरतूद करण्यात आली आहे.  २००९ च्या निवडणुकीत ८० हजार कोटींची माफी केली होती. २५ हजार कोटी रुपये सिंचन प्रकल्पात दिले आहेत. सौर पंप मोदी सरकार येईपर्यंत १ लाखापर्यंत कमी होते मात्र आता १० लाख पर्यंत गेले आहेत. सहकार मंत्रालय पहिल्यांदा सुरु झालं. राष्ट्रीय सहकार धोरण देखील सरकारनं आणलं. ५० वर्षात साखर कारखान्यांना न झालेली मदत मोदी सरकारनं दिली आहे तसेच रस्ते, पायाभूत सुविधा, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, अटल पेन्शन यासारख्या विविध योजनांचा उल्लेख यापूर्वी केवळ आमदार, खासदार, अधिकारी, कर्मचारी, नोकरदार वर्गालाच पेन्शन होती परंतु मोदीजींच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याला देखील अटल पेन्शनच्या माध्यमातून पेन्शन सुरू केली जाऊ शकते असेही आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
 
परतूर येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परतूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणाला नवी गती मिळाली असून आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठकाच पार पडली. परतुर, मंठा आणि जालना तालुक्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीत एकत्र येऊन निवडणूक रणनीती आणि पक्ष संघटन मजबूत करण्यावर सखोल चर्चा करण्यात आली. भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री राहुल लोणीकर म्हणाले की, प्रत्येक निवडणूक जिंकायची असेल तर पक्ष संघटन बळकट करण्याची गरज असून पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने संघटन वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे. पक्ष संघटन मजबूत झाले तर कुठलीही निवडणूक आपण हरवू शकत नाही असेही राहुल लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर देत कार्यकर्त्यांनी  घरोघरी संपर्क, स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे आणि पक्षाच्या विचारधारेला गावपातळीवर पोहोचवण्यासाठी रणनीती आखण्याचे आवाहन आमदार लोणीकर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी स्पष्ट दिशा मिळाली, ज्यामुळे परतूर विधानसभा मतदारसंघात भाजपाची ताकद आणखी वाढेल, ही बैठक केवळ निवडणूक तयारीपुरती मर्यादित नसून, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकजुटीचे आणि विजयाचे बळ निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्थानिक पातळीवरील नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या समर्पणामुळे, परतूर विधानसभा मतदारसंघात भाजपा आगामी निवडणुकांमध्ये प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वास या बैठकीतून निर्माण झाला असल्याचे आमदार बबनराव लोणीकर म्हणाले
 
राज्यात भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे; आमदार बबनराव लोणीकर यांची विठ्ठलचरणी प्रार्थना
शेतकरी सुजलाम् सुफलाम् झाला तर देशातील प्रत्येक नागरिक सुखी आणि समाधानी राहील, त्यामुळे राज्यात भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना आमदार बबनराव लोणीकर यांनी पांडुरंगाचे चरणी केली. आषाढी एकादशी निमित्त परतुर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित महाआरती प्रसंगी आमदार लोणीकर बोलत होते. पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की, आषाढी एकादशीला खूप महत्व असून या दिवशी वारकरी धारकरी आणि शेतकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने पायी जातात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो लोक या वारीत सहभागी होतात. आषाढी एकादशी व्रतामुळे मानसिक शांती आणि शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळते असेही मानले जाते. आषाढी एकादशीच्या वारीमुळे सर्व समाजात समता आणि एकोपा वाढतो, त्यामुळे महाराष्ट्रसह जगभरातील लोक आषाढी एकादशीला पायी पंढरपूरला दिंडी मध्ये जातात. असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
यावेळी शत्रुघ्न कणसे, रमेश भापकर नितीन राठोड विक्रम उफाड कैलास बोराडे संपत टकले विठ्ठलराव काळे अजय अवचार संभाजी वारे विलास घोडके आनंद जाधव किशोर हनवते विकास पालवे राजभाऊ खराबे शिवाजी पाईकराव अशोकराव बुरकुले विष्णू प्रदीप ढवळे मधुकर मोरे रमेश आढाव नितीन जोगदंड गजानन लोणीकर गजानन उफाड दीपक बोराडे सुरेशराव सरोदे भिकूभाऊ लोहिया, सुरेश मंत्री, शिवजी मामा दरगड, दिनेश होलानी, गोविंद मोर, राजेश मंत्री, रमेश सेठ झवर, पुरुषोतम राठी, गोविंद तापडिया, राजगोपाल मोर, ओम शेठ मोर, सतीश सेठ बंदूकवाला, डॉ स्वप्नील मंत्री, सुनिल कासट, श्रीकीसन दरगड, ओम शेठ सालसर, अशोक शेठ बगडिया, माधव जनकवार भगवानराव मोरे, सुधाकर सातोनकर, जगदीश झवर, राजूशेठ मुंदडा, सिताराम राठोड, निर्धास्त राठोड, प्रकाश चव्हाण, अर्जुन जगताप माऊली गोडगे भगवान देशमुख शरद पाटील अमोल मोरे सचिन राठोड प्रदीप चाटे मनोज देशमुख जानकीराम चव्हाण भगवान लहाने जगदीश जाधव नारायण कणसे रवींद्र सोळंके शहाजी राक्षे मिरज खतीब नरेंद्र ताठे सोपान वायाळ रमेश वायाळ कैलास चव्हाण वसंतराव बागल प्रसादराव गडदे तानाजी शेंडगे योगेश बोराडे शरद मोरे दिगंबर आवचार संतोष बोराडे तोफिक कुरेशी वैभव नरवडे सेवकराम राठोड गणेश खैरे सनी तनपुरे अशोकराव डोके महादेव काळे विनोद राठोड  यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

LatestNews

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बालाजी मंदिर येथे संरक्षण भिंतीसाठी लोणीकरांनी दिला २० लक्ष रुपयांचा निधी; व्यापाऱ्यांसह भाविकांनी मानले लोणीकरांचे आभार
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!
खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केले नाथांच्या पालखी रथाचे सारथ्य
अमरनाथ यात्रेला जालन्यातून भाविक रवाना
अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन; नागरिकांचा ईशारा
आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज