भारतच चॅम्पियन्स; मालिकेत अजेय कामगिरी करत तिसर्‍यांदा जिंकली चॅम्पियन ट्रॉफी

भारतच चॅम्पियन्स; मालिकेत अजेय कामगिरी करत तिसर्‍यांदा जिंकली चॅम्पियन ट्रॉफी

भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे जेतेपद पटकावले आहे. भारताने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात 4 विकेट्सने पराभव केला. जडेजाने 49व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे. रोहित शर्माने 76 धावा करत सामन्याचा सामनावीर ठरला.

भारताच्या विजयासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद तिसर्‍यांदा पटकावणारा पहिला संघ ठरला. यासह भारताने गेल्या 10 महिन्यात दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकत ट्रॉफी आपल्या नावे केली. न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा  कर्णधार रोहित शर्माने वादळी खेळी करत संघाच्या विजयाच्या पाया रचला. रोहित शर्माने 83 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 76 धावा केल्या, तर शुबमन गिलने 50 चेंडूत एका षटकारासह 31 धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलच्या भागीदारीने भारताला सामन्यात कायम ठेवलं. श्रेयस अय्यर 62 चेंडूत 2 चौकार 2 षटकारांसह 48 धावा करत बाद झाला. तर अक्षर पटेलने 40 चेंडूत 1 चौकार 1 षटकारासह 29 धावा करत बाद झाला. तर राहुल आणि हार्दिकने भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. तर रवींद्र जडेजाने विजयी चौकारासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात 34 धावांची नाबाद खेळी खेळून टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर ठेवत राहुल नाबाद परतला. यावेळी त्याला हार्दिक पंड्याचीही साथ लाभली ज्याने 18 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. किवी संघाकडून मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले. 

397926

Read More महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा एकदा भारताच्या फिरकी चौकडीने आपली कामगिरी चोख बजावली. भारताच्या फिरकी विभागाने चांगली कामगिरी करत धावांवर अंकुश ठेवला आणि न्यूझीलंडला 251 धावांवर रोखलं. रचिन रवींद्र आणि विल यंगने किवी संघाला अर्धशतकी भागीदारी रचत चांगली सुरूवात केली. पण रोहित शर्माची रणनिती आणि भारताच्या फिरकी विभागाने टीम इंडियाला सामन्यात परत आणले. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने 37 धावा, डॅरिल मिचेलने 63 धावा आणि ब्रेसवेलने 53 धावांची खेळी केली.

Read More ‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

भारताकडून कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्तीने 2 विकेट्स तर रवींद्र जडेजा-मोहम्मद शमीने 1-1 विकेट घेतली. रोहित शर्माने कमालीचे नेतृत्त्व करत संघाला विजय मिळवून दिला.

LatestNews

‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन
“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”
सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन
महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन