माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा: शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची ग्वाही
आमदार लोणीकर यांच्या या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख समजून घेणारे ते महाराष्ट्रातील एकमेव आमदार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.
जालना | प्रतिनिधी - जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी आज जालना तालुक्यातील पास्टा, पाथरूड आणि बाबर पोखरी गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
पास्टा येथील नुकसानीची पाहणी


पाथरूड येथे कापूस पिकाचे नुकसान
बाबर पोखरी येथे पंचनाम्यांचे आदेश
बाबर पोखरी गावात आमदार लोणीकर यांनी शेतकरी विलास जाधव यांच्या कापूस पिकाची पाहणी केली. यावेळी पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बाबर पोखरी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, तहसीलदार छाया पवार, गटविकास अधिकारी संदीप पवार, तालुका कृषी अधिकारी विष्णू राठोड, डॉ. शरद पालवे, गजानन खराबे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
आमदार लोणीकर यांच्या या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख समजून घेणारे ते महाराष्ट्रातील एकमेव आमदार असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. लोणीकर यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा आणि शेतकऱ्यांप्रति असलेले प्रेम यामुळे त्यांना सर्वत्र कौतुकाची थाप मिळत आहे

About The Publisher
