जालना । प्रतिनिधी - परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे यांनी सतरा वर्षांपूर्वी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्याकडे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा अशी मागणी केली होती.
महायुती सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले असून ब्राह्मण समाजाच्या वतीने माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा सत्कार करण्यात आला होता.
ह्या सत्कारदरम्यान माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी बोलतांना सांगितले होते की, परशुराम आर्थिक विकास महामंडळास जास्तीत जास्त आर्थिक तरतूद कशी होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची प्रतिपादन खोतकर यांनी केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून परशुराम विकास महामंडळाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ जास्तीत जास्त तरतूद करून द्या अशी मागणी माजी मंत्री खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली होती मुख्यमंत्री शिंदे यांनी परशुराम महामंडळाला 50 कोटीची तरतूद करून दिली आहे.
माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नाला पुन्हा यश आले आहे. ब्राह्मण समाजाच्या वतीने माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचे बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे, अॅड. सुनील किनगावकर. भगवान पुराणीक, रवींद्र देशपांडे यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले आहे.
