पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर, रक्तदान हेच खरे जीवनदान - भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे
जालना | प्रतिनिधी - देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी जालना येथे तेरापंथ युवक परिषद आणि भारतीय जनता पार्टी जालना महानगर तर्फे सामाजिक बांधिलकी जपत महा रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आणि स्वच्छता अभियान या भव्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम गुरु गणेश भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पार पडला. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, विजय कामड, विमलताई आगलावे, माजी जिल्हाध्यक्ष अशोक पांगारकर, भाजपा युवानेते अक्षय गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती होती.


संपूर्ण कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत मोदीजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान, आरोग्य तपासणी आणि स्वच्छता अभियान या तिन्ही उपक्रमांद्वारे जनजागृती व सेवा करण्याचा सुंदर संदेश जालना शहरभर पोहोचविण्यात आला.
यावेळी धनराज काबलिये, अर्जुन गेही, संध्याताई देठे, शुभांगीताई देशपांडे, सोपान पेंढारकर, चंपालाल भगत, राज स्वामी, जिवन सले, सुनील पवार, रमेश गौरक्षक, सिद्धिविनायक मुळे, अरुणाताई जाधव, सखुबाई पणबिसरे, ममता कोंडयाल, वर्षाताई ठाकूर, वंदना ढगे, वैशाली बनसोडे, दिपाली बिनीवाले, पुष्पा मेहेत्रे, शैलेजा निकाळजे, पूर्व जालना मंडळाध्यक्ष अमोल धानोरे, नवीन जालना मंडळाध्यक्ष सुनिल खरे, जुना जालना मंडळाध्यक्ष महेश निकम, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, प्रा.राजेंद्र भोसले, गोविंद भताने, सोमेश काबलीये, सोमनाथ गायकवाड, श्रीमंत मिसाळ, राजू गवई, महेंद्र अकोले, चेतन देसरडा, बाबुराव भवर, देविदास देशमुख, राजेश जोशी, शिवराज जाधव, हरिभाऊ गोरे, सतीश केळकर, डोंगरसिंग साबळे, सचिन मोहता, पंकज किल्लेदार, संजय माधव वाले, रोहित खोडवे, संतोष खंडेलवाल, विकास कदम, करण निकाळजे, उमेश अग्रवाल, कृष्णा खिल्लारे, डोंगरसिंग साबळे, रोहित खोडवे, निर्गुण वाढेकर, उमेश पेंढारकर, गौरव गोधेकर, काशिनाथ पवार, बबलू छडीदार आदींसह उपस्थिती होती.

About The Publisher
