कोट्यवधींचे नुकसान, जनतेचे हाल; भाजपाची तातडीच्या मदतीसाठी मागणी, जालना आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करा - भास्कर दानवे

कोट्यवधींचे नुकसान, जनतेचे हाल; भाजपाची तातडीच्या मदतीसाठी मागणी, जालना आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करा - भास्कर दानवे

जालना | प्रतिनिधी - जालना तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत पाणी साचून नागरिकांच्या घरात पाणी घुसले, तर व्यापार, व्यवसाय व शेती क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. शहरातील बाजारपेठा, दूकाने, घरगुती साहित्य, शेतीमाल व वाहने यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानाची आज (दि.१८) रोजी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी लक्कडकोट परिसर, हनुमानघाट, खांडसरी परिसर, सेंटमेरी शाळेमागील परिसर, इदगाह रोड परिसर या सह शहरातील अनेक भागात पाहणी केली.

IMG-20250918-WA0010

या परिस्थितीची गंभीर दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर  दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे तात्काळ पंचनामे करण्यासाठी संबंधितास आदेश देण्याची मागणी केली व तहसीलदार, जालना व आयुक्त, जालना महानगरपालिका व प्रशासनाला तातडीने नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

यावेळी त्यांनी म्हटले की, “शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी व शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष होऊ नये. प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबवून तातडीने आर्थिक सहाय्य द्यावे.” भास्कर दानवे यांनी पुढे सांगितले की, शासनाकडून मदत येईपर्यंत महापालिका व जिल्हा प्रशासनाने स्थानिक स्तरावर तत्काळ उपाययोजना कराव्यात. पूरग्रस्त भागांत रोगराई पसरू नाही म्हणून आरोग्य पथके तैनात करावीत, पिण्याच्या पाण्याची सोय करावी तसेच वीजपुरवठा खंडित झालेल्या भागात तत्काळ व्यवस्था करावी. पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांची भीषण अवस्था झाली. लहान मुले, महिला व वृद्ध नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. काही ठिकाणी भिंती कोसळल्याच्या घटना तर काही ठिकाणी झाडे उपटून पडल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

Read More  “हर भारतीय का बँक आणि भारतीयांनाच त्रास”? RBI ने लक्ष घालण्याची मागणी

IMG-20250918-WA0014

Read More हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार

यावेळी जिवन सले, धनराज काबलिये, सुनील खरे, संजय डोंगरे, वसंत शिंदे, अमोल कारंजेकर, दुर्गेश कुरील, कल्याण भदनेकर, गेंदालाल झुंगे, सोमेश काबलीये, हेमंत भूरेवाल, विकास कदम, शाम उगले, रोहित नलावडे, अमन मित्तल आदींची उपस्थिती होती.

LatestNews

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन; दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन
अस्मानी संकटाची छाया; जालन्यात रेड अलर्ट जारी, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे नागरिकांना आवाहन; आमदार बबनराव लोणीकर व आमदार अर्जुनराव खोतकर यांनीही केली काळजी घेण्याची विनंती
आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार
जालना महानगरातील मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीतील नागरिक संकटात; तय्यब बापु देशमुख यांच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन
“हर भारतीय का बँक आणि भारतीयांनाच त्रास”? RBI ने लक्ष घालण्याची मागणी
मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून... रिकाम्या प्लॉटवरील पाणी; महापालिकेची अनोखी जनसेवा!